You are currently viewing “आम्ही बालकवी सिंधुदुर्ग” या सामाजिक संस्थेतर्फे पावसाळी ऑनलाईन कवी संमेलन थाटात संपन्न

“आम्ही बालकवी सिंधुदुर्ग” या सामाजिक संस्थेतर्फे पावसाळी ऑनलाईन कवी संमेलन थाटात संपन्न

“आम्ही बालकवी सिंधुदुर्ग” ही उभरत्या बालकवींसाठी राज्यस्तरीय काम करणारी सामाजिक संस्था आहे. आम्ही बालकवी या सामाजिक संस्थेतर्फे तिसरे ऑनलाईन कवी संमेलन दि.४ जुलै रोजी संध्याकाळी पार पडले. तब्बल अडीज तास चाललेल्या ऑनलाईन कवी संमेलनाचे दीप प्रज्वलन करून मुंबई येथून कु. वैभवी रेडकर हिने उद्घाटन केले तसेच स्वागत गीत सादर करून काव्य संमेलनाची सुरुवात केली. काव्यसम्मेलनाचे सूत्रसंचालन औरंगाबादच्या छोट्या कु.सिद्धी सोसे हिने केले. सूत्रसंचालन करताना छोटी असूनही आपल्या अलंकारयुक्त, सूत्रबद्ध व अभ्यासपूर्ण शब्दचातुर्याने तिने सारस्वतांच्या कवितांचे कौतुक केले.
आम्ही बालकवी संस्थेच्या वतीने आयोजित काव्य संमेलनात तनिष्का सावंत, कु.मधुरा गोंदाणे, सौ.निलम शिवगण, लक्ष्मीदेवी रेड्डी, सौ. सायली कोयंडे, ओंकार राठोड, सिध्देश पाटील, सिध्देश उतेकर, भूमी वाघ, चंद्रकला जोशी, अशा अनेक सारस्वतांनी आपल्या अप्रतिम रचना सादर केल्या. काव्य संमेलनात रचना सादर करण्यासाठी वेळेचे बंधन नव्हते, त्यामुळे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संमेलन संपन्न झाले. काव्य संमेलनाला सौ कल्पना नागमोती, नाशिक, व सौ अनुराधा उपासे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तसेच सौ देवयानी आजगावकर, सिंधुदुर्ग यांनी संस्थेचा लेखाजोखा सादर केला. कवी संस्थापक राजेंद्र गोसावी यांचा या काव्यसम्मेलन आयोजण्यात सिंहाचा वाटा होता. नवनवीन कवी कावयित्रींन्नी आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ त्यांनी तयार केले आहे. त्यांच्याच प्रेरणेतून पुढे आलेल्या बालकवींच्या हृदयस्पर्शी, वास्तववादी व भावपूर्ण रचनांनी काव्यसम्मेलनाला खरी लज्जत आणली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =