You are currently viewing आणखीन एक दलाल कातडी तस्करीत

आणखीन एक दलाल कातडी तस्करीत

बिबट्याचे कातडे विक्रीस नेणाऱ्या ५ जणांना जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग व वन अधिकाऱ्यांनी गुरुवारी मळगाव येथे जेरबंद केले होते. त्यांच्याकडून सुमारे ३.५० लाख रुपये किमतीच्या कातडी सह वाहतुकीसाठी वापरलेली कॉलीस गाडी जप्त केली होती तर ५ संशयितांना अटक करत त्यांच्यावर वन्यजीवन अधिनियम १९७२ नुसार तस्करीचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी नंतर या संशयितांना पुढील तपासासाठी वनविभागाच्या ताब्यात दिले याप्रकरणी वनखात्याने प्राथमिक तपास केला असता अजून एक दलाल असल्याचे निष्पन्न झाले त्याला अटक करून या तस्करीचा आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध आहे की नाही याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व पाचही संशयित तस्करांना वन कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

शुक्रवारी सावंतवाडी न्यायालयासमोर बिबट्याच्या कातडीसह अटक करण्यात आलेल्या ५ ही जणांना हजर केले असता न्यायालयाने या सर्वांना सोमवार २० सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एका दलालाचा सहभाग निश्चित झाला असून वनखाते त्यांच्या शोधात आहे. त्याला अटक करण्यासाठी या ५ ही आरोपींना वन कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद सावंतवाडीचे मदन वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी केला आहे. त्यांचा युक्तिवादाला ग्राह्य मानत न्यायालयाने सर्व संशयितांना कोठडी सुनावली आहे.

बिबट्या सारख्या कायद्याने संरक्षित वन्यप्राण्यांची शिकार करणे त्यांची कातडी बाळगणे यासाठी वन्यजीवन संरक्षण अधिनियम १९७२ नुसार कमीत कमी ३ ते ७ वर्षे आणि १० हजार रुपये दंड शिक्षा आहे. या प्रकरणातील दोन संशयितांची पार्श्वभूमी गुन्हेगारांची असल्याचे समोर आले आहे. वन कायद्यांतर्गत या सर्वांची सखोल चौकशी करण्यात येईल. अशी माहिती वनक्षेत्रपाल मदन शिरसागर यांनी दिली.

यावेळी जिल्हा उपवनसंरक्षक संभाजी नारनवर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सर्जेराव सोनवडेकर, वनक्षेत्रपाल मदन शिरसागर, वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गौरेश राणे आणि वनपाल काशीद, राणे, वनरक्षक सावळा कांबळ व अन्य वन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =