You are currently viewing राज्यातील लोककलावंतांना शासकिय लाभ मिळवून देण्यासाठी समितीची निवड

राज्यातील लोककलावंतांना शासकिय लाभ मिळवून देण्यासाठी समितीची निवड

जिल्ह्यातील दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण व दिनेश गोरे यांची सदस्यपदी निवड

सिंधुदुर्ग :

राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी / प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून शासन निर्णयाद्वारे समिती पुनर्घठीत करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जेष्ठ दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण, व हरहुन्नरी दशावतारी कलाकार दिनेश गोरे यांची निवड या समितीच्या सदस्यपदी करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

महाराष्ट्रातील सर्व लोककला टिकून राहाव्यात व लोककलांची पुढील पिढींना माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपारिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन द्यावे, या हेतूने त्यांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी / प्रयोग अनुदानासाठी अनुदान देण्याच्या योजनेस शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली होती. तसेच सदर शासन निर्णयान्वये कलापथकांना भांडवली खर्चासाठी / प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी या कलापथकांच्या अर्जाची छाननी करणे व त्यांची पात्रता तपासून निवड करण्यासाठी निवड समिती गठीत करण्याची तरतूद होती. त्यानुषंगाने राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी / प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी समिती पुनर्घठीत करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीच्या अध्यक्षपदी असून सदस्यपदी माया खुटेगावकर,सुधीर कलिंगण,दिनेश गोरे, अभय तेरदाळे,पुरुषोत्तम बोंद्रे,अलंकार टेंभूर्णे,सुरेशकुमार वैराळकर,अंबादास तावरे,विलास सोनावणे,मोहित नारायणगावकर यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सदर समिती शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षे कालावधीसाठी किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत कार्यरत राहणार आहे.असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − 4 =