You are currently viewing जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अरुणा प्रकल्पग्रस्त आक्रोश आंदोलन करणार ……

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अरुणा प्रकल्पग्रस्त आक्रोश आंदोलन करणार ……

वैभववाडी

अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रलंबीत मागण्यासाठी जिल्हाधिकारी व संबंधीत कार्यालयाला पत्र दिल्या नंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी अमोलसिंह भोसले तहसिलदार रामदास झळके पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून स्वातंत्रदिनी आंदोलन करु नये, तसेच प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली. त्याला अरुणा प्रकल्पग्रस्तांनी सकारात्मक प्रतिसादही दीला होता. परंतु या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता हर्षद यादव यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्न व समस्यांबाबत अवहेलना करणारे पत्र काढले आहे.

दरम्यान संतप्त अरुणा प्रकल्पग्रस्तांनी या पत्रकाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या समोर कार्यकारी अभियंता याच्या पत्राची होळी करुन प्रकल्पग्रस्त आक्रोश आंदोलन करणार असल्याची माहिती लढा संघर्षांचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा या संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, सेक्रेटरी अजय नागप, राजू नागप, भाई कदम, विलास कदम, अशोक नागप, आरती कांबळे, सुचिता चव्हाण आदी पदाधिका-यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − fourteen =