You are currently viewing सावंतवाडी खासकीलवाडा येथे दुकानात चोरी प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल

सावंतवाडी खासकीलवाडा येथे दुकानात चोरी प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल

४० हजारांची रक्कम लंपास…

सावंतवाडी

येथिल खासकीलवाडा भागातील सुनील होडावडेकर यांचे टपरीवजा दुकान फोडून अज्ञात चोरट्याकडुन ३९ हजाराची रोख रक्कम चोरट्याने लांबविली आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबतची माहीती मिळताच पोलिसांनी त्या ठीकाणी धाव घेतली. दरम्यान या चोरीत माहीतगाराचाच हात असल्याचा संशय आहे. तर टपरी मालक होडावडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होडावडेकर यांची टपरी कुटीर रुग्णालयाच्या मागच्या गेटला लागून आहे. त्या ठीकाणी ते व्यावसाय करतात. आज सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या दुकानाचा दरवाजा उचकटलेल्या अवस्थेत दिसला. यावेळी त्यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने पोलिसांना खबर दिली. दरम्यान बाजूला सीसीटिव्ही असल्यामुळे पोलिसांना संबधित चोरट्याचा शोध घेणे सोईचे ठरणार आहे. त्यानुसार आमचा तपास सुरू आहे, अशी माहीती पोलिस हवालदार बाबू तेली यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 12 =