You are currently viewing यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणारा अभियंता दिन अर्थात इंजिनिअर्स डे येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम प्राचार्य गजानन भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व डॉ.विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सिव्हिल विभागप्रमुख प्रा.प्रसाद सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व डॉ.विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची माहिती दिली.

यानंतर संस्थेचे जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये व प्राचार्य गजानन भोसले यांनी मनोगत व्यक्त केले व इंजिनिअर्स डे निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमधून रेणुका भोगण व समता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

देशाच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉ.सतीश धवन यांच्या जीवनकार्याविषयीची चित्रफित याप्रसंगी उपस्थितांना दाखविण्यात आली._
_कार्यक्रमाला मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.अभिषेक राणे, कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा.प्रशांत काटे, इलेक्ट्रिकल विभागाचे प्रा.बी.एम पाटील, ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.मिलिंद देसाई, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा.नेहल सांडये व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता. सर्वांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सिव्हिल विभागाच्या प्रा.हवाबी शेख यांनी केले. त्यांना सिव्हिल विभागाच्या प्रा.नंदिता यादव, प्रा.पार्थ नाईक, प्रा.प्रसाद मणेरीकर व प्रा.तेजस नाईक यांचे सहाय्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 5 =