You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली आणि कुडाळ येथे प्रथमच झाली नीट परीक्षा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली आणि कुडाळ येथे प्रथमच झाली नीट परीक्षा

८७१ विध्यार्थ्यांनी दिली “नीट”

कणकवली
बारावी नंतरच्या वैद्यकीय शैक्षणिक प्रवेशासाठी महत्वाची असलेली “नीट” परीक्षा रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि कुडाळ या दोन केंद्रांवर झाली. कणकवली विद्यामंदिर हास्कुलच्या केंद्रावर ३२७ पैकी ३०३ विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली.२४ विध्यार्थी गैरहजर होते.तर कुडाळ हास्कुल केंद्रावर ६०० पैकी ५७८ विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली,३२ जण गैरहजर होते.एकूण ९२७ पैकी ८७१ विध्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात नीट परीक्षा केंद्राची मागणी गेली अनेक वर्षे सुरू होती मात्र दिल्लीत नारायण राणे हे केंद्रीय उद्योग मंत्री होताच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा करून हे नीट परीक्षा केंद्र तातडीने मंजूर केले त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विध्यार्थाना जिल्हातच परीक्षा देता आली.

कणकवली आणि कुडाळ या दोन्ही केंद्रांवर सुरळीत परीक्षा झाली. पोलीस बंदोबस्तात ही परीक्षा झाली.परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.कुडाळ हास्कुल केंद्रात केंद्र संचालक ए. के. जामसंडेकर याच्या सह एम.डी. हवळ, सचिन मेस्त्री,नंदकुमार नाईक ,लक्षुमन पावसकर यांच्या पथकाने काम पाहिले तर कणकवली हास्कुल च्या केंद्रावर केंद्रसंचालक बी.डी.सरवदे, पी.जे.कांबळे, विशाल सावंत, अ. व्ही.वणवे, लक्ष्मण पावसकर यांच्या पथकाने काम पाहिले. निट ची पहिलीच परीक्षा असतांना कोणताही गोधळ न होता सुरळीत परीक्षा संपन्न झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा