You are currently viewing इन्सुली मेट परिसरात कंटेनरला अपघात

इन्सुली मेट परिसरात कंटेनरला अपघात

सावंतवाडी

चालकाचा ताबा सुटल्याने रंगाची वाहतूक करणारा कंटेनर थेट झाडाला आदळून अपघात झाला. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इन्सुली मेट परिसरातील अवघड वळणावर घडली. दरम्यान सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गाडीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. तर अपघाता नंतर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. यावेळी इन्सुली मेट परिसरातील अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट झाडावर जाऊन आदळली. यात कंटेनरच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र चालक व क्लिनर सुदैवाने बचावले.

प्रतिक्रिया व्यक्त करा