You are currently viewing मुंबई गोवा महामार्गावर वागदे टेंबवाडी येथे कार अपघातात तिघे जखमी

मुंबई गोवा महामार्गावर वागदे टेंबवाडी येथे कार अपघातात तिघे जखमी

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर वागदेत टेंबवाडी येथे रविवारी सकाळी 10 वा च्या सुमारास अपघात घडला.सावंतवाडीच्या दिशेने जात असताना कार वरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या संरक्षक कठड्याला आदळून झालेल्या अपघातात कारमधील तीन जण किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ बबलू गावडे, सचिन गावडे आदिनी घटनास्थळी धाव घेत जखमीना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत हे उपजिल्हा रुग्णालयात जात त्यांनी जखमींची विचारपुस केली. या अपघातात कारचे ही नुकसान झाले आहे. सुदैवाने कार खाली कोसळली नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

प्रतिक्रिया व्यक्त करा