परशुराम गंगावणेे यांचे छायाचित्र पोस्टाच्या तिकिटावर

परशुराम गंगावणेे यांचे छायाचित्र पोस्टाच्या तिकिटावर

सिंधुदुर्ग

सन २०२१ चा पद्मश्री पुरस्कारप्राप्त ठाकर लोककलाकार परशुराम गंगावणे यांच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय पोस्ट खात्याने त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट प्रसिद्ध केले आहे. सिंधुदुर्ग विभागाचे डाक अधीक्षक ए. बी. कोड्डा यांनी परशुराम गंगावणे यांची भेट घेऊन त्यांना या ‘माय स्टॅम्प’ ची भेट देऊन त्यांचा गौरव केला.

ठाकर लोककलाकार परशुराम गंगावणे यांना अलीकडेच त्यांच्या कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. ठाकर कलांगणच्या माध्यमातून त्यांनी पुरातन अशा ठाकर कलेचे जतन केले आहे. गंगावणे यांना पदमश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंधुदुर्गच्या डाक विभागाने सुद्धा त्यांचा गौरव केला आहे.

सिंधुदुर्ग डाक विभागाचे ए बी कोड्डा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परशुराम गंगावणे यांनी उभारलेल्या ठाकर कलांगणला भेट दिली. परशुराम गंगावणे यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट त्यांनी गंगावणे यांना भेट देऊन त्यांचा गौरव केला. तसेच ठाकर कला आंगणची पाहणी करून ठाकर लोककलेचे जतन केल्याबद्दल गंगावणे यांचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा