You are currently viewing सर्वधर्मसमभाव

सर्वधर्मसमभाव

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य जेष्ठ कवी श्री.अरुण पुराणिक, पुणे यांची काव्यरचना

सर्वधर्मसमभाव
सर्व धर्मांचा आदर
एक विशिष्ट विश्वास ।
जीवनात साकारता
जगण्याची एक आस ।। १ ।।

धर्म बंधन कशाला
मानवता हाच धर्म ।
माणुसकी हीच जात
पुण्य हेच निज कर्म ।। २ ।।

सर्व धर्म समभावी
भगवंत एक आहे ।
आत्मा एक रूपे बहु
चराचरी साक्ष ग्वाहे ।। ३ ।।

जात धर्म परंपरा
अर्थार्जन हेच मूल्य ।
एकोप्याचा महामंत्र
जीवनात गुरुतुल्य ।। ४ ।।

प्रेम करण्या जगाला
माणुसकी हीच साथ ।
व्यक्ती सापेक्ष मदत
होणे केवळ अनाथ ।। ५ ।।

जनरीत खेडोपाडी
जात ,पात , धर्म , भेद ।
उच्चनीच भावनांनी
हदयात होतो छेद ।। ६ ।।

*अरुण त्रिंबक पुराणिक*, *पुणे*..
*B. Sc.( Hons) B. Ed.*
*९७६६५४९६२०*

प्रतिक्रिया व्यक्त करा