You are currently viewing वऱ्हाडी कविता

वऱ्हाडी कविता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी स्वप्निल मानकर लिखित अप्रतिम वऱ्हाडी कविता*

🙏 *वऱ्हाडी कविता* 🙏

आज १९ एप्रिल *जागतिक लिव्हर दिवस* म्हणून साजरा केला जातो , लिव्हर खराब होण्याचे मुख्य कारण दारू आहे त्यानिमितात्त केलेली एक जनजागृतीपर एक कविता……

*“कायले पीतं दारू”*
( .डॉ. स्वप्नील मानकर )

*कायले पीतं दारू बाबू कायले पीतं दारू !*
*लाखमोलाचा तुया जीव फुकट नको मारू !!*

दारू पिऊन कोणाचं !
भलं झालं हाय काय !!
संसाराचं झालं वाटोयं !
कोसयलं सारं आभाय !!
*सोन्यासारखे बायकोपोरं दूर नको सारू !*
*कायले पीतं दारू बाबू कायले पीतं दारू !!*

दिवसभर मर मरून !
काम करून कमवतं !!
जेवढं कमवलं तेवढं !
राती पिवून गमवतं !!
*घरी खा ची सोय नाही उपाशी तुयं लेकरू !*
*कायले पीतं दारू बाबू कायले पीतं दारू !!*

दारू पिवून गावभर !
नाली गटारानं लोयनं !!
बापानं कमवलेलं नाव!
निर्रा मातीमधी घोयनं !!
*गावात इज्जतीचा भाजीपाला नको करू !*
*कायले पीतं दारू बाबू कायले पीतं दारू !!*

घरी येऊनबी तू काय !
चुपचाप थोडी बसते !!
बिनकामीच बायकोले !
मारझोड करत असते !!
*पायटी पश्चाताप करून डोक्सं नको धरू !*
*कायले पीतं दारू बाबू कायले पीतं दारू !!*

बायकोपोरांची जिम्मेदारी !
तुयीच तं हाय ना भाऊ !!
नशेत नको उडवू पैसा !
पोराच्या शिक्षणाले लावू !!
*पोरं होतीन सायेब तर मानतील तुले गुरु !*
*कायले पीतं दारू बाबू कायले पीतं दारू !!*

आतातर तुये बेकार !
झाले म्हणते हाल !!
बायको करते काम !
तू खातं आयता माल !!
*चिकटला बाजीले उलटी गिनती झाली सुरु !*
*कायले पीतं दारू बाबू कायले पीतं दारू !!*

सडन पुरं शरीर तुयं !
पोटात किडे पडतीन !!
रक्ताच्या मंग उलट्या !
करून करून मरशीन !!
*यमराज बी मनल संगं नेऊका इथंच पुरू !*
*कायले पीतं दारू बाबू कायले पीतं दारू !!*

कराले गेलता काय !
होऊन बसलं काय !!
खालतं झालं मुंडकं !
अन वरते झाले पाय !!
*आता तरी सोड भविष्याले जरा सावरू !*
*कायले पीतं दारू बाबू कायले पीतं दारू !!*

खरच सांगा बाबांनो !
पिऊन मिळते काय !!
क्षणाचा आनंद तिथे !
बाकीच दुःखच हाय !!
*स्पर्शही नाही करेन असा निर्धार मनी धरू !*
*नाही पिणार दारू आता नाही पिणार दारू !!*

…..शीघ्रकवी स्वप्नील
१९/०४/२०२३
डॉ. स्वप्नील मानकर
मानकर बाल रुग्णालय
शिन्दे प्लॉट्स यवतमाळ
9850330301
©© आवडल्यास कृपया नावासाहित फॉरवर्ड करा
धन्यवाद
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
शब्दार्थ
निर्रा :- नुसते
पुरू ( पुरणे ) :- गाडणे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 14 =