You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त….

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त….

लवकरच नविन चेहऱ्यांना संधी देऊन करणार कार्यकारणी जाहीर – युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक

सिंधूदूर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी आज युवक राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. तत्पूर्वी युवक प्रदेशाध्यक्ष मा.मेहबुब शेख साहेब तसेच बेसिक पक्ष निरीक्षक मा.आमदार शेखरजी निकम,  जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत, युवक पक्ष निरीक्षक मा.डॉक्टर चाळके या नेत्यांशी चर्चा करून कार्यकारिणी बरखास्ती बाबत घेतला निर्णय घेतला.

गणेश चतुर्थी नंतर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा.

लवकरच नवीन कार्यकारणी करताना नवीन आणि होतकरू चेहर्‍यांना संधी देताना सक्षम तसेच प्रत्येक तालुक्यात निरीक्षक नेमुन बैठक घेणार.आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील बेसिक सह सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांची निवड करून युवक जिल्हा कार्यकारीणी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  गणेश चतुर्थी नंतर जिल्हा युवक पक्ष निरीक्षक डॉ. चाळके सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात येणार असुन त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यात ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवक वर्गाचा चांगला प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे युवक मोठ्या प्रमाणात आकर्षिक होत आहेत.

युवक जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर लगेचच सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात उपमुख्यमंञी नाम.अजितदादा पवार, पक्ष निरीक्षक आमदार शेखरजी निकम युवक प्रदेशाध्यक्ष मा.मेहबूब शेख, युवक पक्ष निरीक्षक डॉ. चाळके यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांच्या सहकार्याने युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी युवक संघटना मजबुत करण्यासाठी तसेच तरुण वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून जिल्ह्य़ातील युवकांना आर्थिक सुबत्ता यावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्य नाम.अजितदादा पवार यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार, असे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा