You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व एस. टी. फेऱ्या गणेशोत्सवापूर्वी होणार सुरु

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व एस. टी. फेऱ्या गणेशोत्सवापूर्वी होणार सुरु

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली वाहतूक नियंत्रकांची भेट

कणकवली

गणेश चतुर्थी आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बंद असलेल्या एसटीच्या फेऱ्या तात्काळ चालू करा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज एसटी महामंडळाचे जिल्हा वाहतूक नियंत्रक आर. एल. कांबळे यांची भेट घेतली. यावेळी कांबळे यांनी सर्व बस फेऱ्या सुरू करण्याचे मान्य केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश आले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवाजी घोगळे, सुनील भोगटे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, प्रफुल्ल सुद्रीक, युवक राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कणकवली तालुका युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सागर वारंग, शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर, राजेंद्र पाताडे, कुर्ली गावचे जेष्ठ नागरिक प्रकाश सावंत, जयेश परब, अजय जाधव आदी उपस्थित होते.

गणेश चतुर्थीचा उत्सव जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मुंबईकर चाकरमानी दाखल होत आहेत. तसेच गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची रेलचेल सुरु आहे. परंतु जिल्ह्यात एसटी बस फेऱ्या बंद असल्याने ग्रामीण भागात प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे संकटही कमी झाले आहे. त्यामुळे चतुर्थीच्या काळात होणारी गैरसोय लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. ही मागणी मान्य करत जिल्ह्यातील सर्व बस फेऱ्या सुरू करायला एसटी विभाग नियंत्रकांनी मान्यता दिली आहे. दरम्यान सकाळी 9.30 वाजता सुटणारी फोंडा कुर्ली बस फेरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू होत आहे. यामुळे या भागातील लोकांची समस्या दूर होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + five =