You are currently viewing मिठमुंबरी- बागवाडी बीचवरुन तब्बल ११८ ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले सोडली समुद्रात 

मिठमुंबरी- बागवाडी बीचवरुन तब्बल ११८ ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले सोडली समुद्रात 

मिठमुंबरी- बागवाडी बीचवरुन तब्बल ११८ ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले सोडली समुद्रात

देवगड

शनिवार दि.१३ एप्रिल सायंकाळी ५.३० च्या सुमारास मिठमुंबरी
बीचवर ऑलिव्ह रिडले कासवांची एका घरट्यातून १२३ अंड्यापैकी ८१ पिल्ले तर दुसऱ्या घरट्यातून ९५ पैकी ३७ पिल्ले सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात आली.

याप्रसंगी वनविभागाचे देवगड विभागाचे वनरक्षक निलेश साठे, वनमजूर कृष्णा सुद्रिक उपस्थित होते. या प्रसंगी मिठमुंबरी गावाचे
सरपंच बाळकृष्ण गांवकर, कांदळवन समितीचे बीच मॅनेजर लक्ष्मण तारी, गाबीत समाज देवगड अध्यक्ष संजय पराडकर ,प्रियांका तारी,नारायण तारी,मयुरेश तारी, ओमकार तारी,प्रमोद आडकर, रोहन तारी, अभय पराडकर,नंदकिशोर पराडकर,हितेश खवळे,भूषण निकम आदि मान्यवर उपस्थित होते.

कासव संवर्धनच्या माध्यमातून वनविभाग सावंतवाडी, कांदळवन कक्ष- मालवण व कांदळवन प्रतिष्ठान – मुंबईच्या माध्यमातून
आगामी काळात या मिठमुंबरी बीचवर कासव महोत्सव आयोजित करण्यात यावा जेणे करून बहुसंख्य ग्रामस्थ व पर्यटक यांना कासव संवर्धनाचे महत्त्व व येथील संपन्न जैवविविधतेची परिपुर्ण माहिती घेता येईल व कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद लुटता येईल अशी मागणी देखील यावेळी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा