You are currently viewing गणेशचतुर्थीसाठी बांद्यात पार्किंग व्यवस्था नियोजन

गणेशचतुर्थीसाठी बांद्यात पार्किंग व्यवस्था नियोजन

बांदा पोलीस स्थानकात बैठक संपन्न

बांदा
गोवा सीमेलगत असलेल्या बांदा बाजारपेठेत गणेशचतुर्थीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या आणि इतर बाबींवर चर्चा व उपाययोजना करण्यासाठी व्यापारी, ग्रामपंचायत प्रशासन तसेच बांदा पोलीस यांची एकत्रित बैठक बुधवारी बांदा पोलीस सहाय्यक निरीक्षक श्यामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी बाजारपेठ संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीत फटाके न वाजविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

गणेशचतुर्थी निमित्त बांदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. बांदा दशक्रोशी तसेच गोवा येथून मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी नागरिक येत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि वाहने पार्किंग करण्यासाठी अडचणी येत असताना. त्या अनुषंगाने बांदा पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी कट्टा कॉर्नर, केंद्रशाळा, कन्याशाळा ते खेमराज हायस्कुल मार्ग, बांदेश्वर मंदिर, आळवाडी मैदान, मशिदी जवळील मोकळ्या जागेत पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. बांदा शहरासाठी १० होमगार्ड देण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक काळे यांनी दिली.

यावेळी सरपंच अक्रम खान, उपसरपंच हर्षद कामत, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, राजेश विरनोडकर,
पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, पोलीस कर्मचारी विजय जाधव, सिद्धार्थ माळकर, व्यापारी दत्तप्रसाद पावसकर, मंगलदास साळगावकर, संदेश पावसकर, सर्वेश गोवेकर, राकेश केसरकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा