You are currently viewing युवक राष्ट्रवादीकडून बांद्यातील नूतन पोलीस निरीक्षकांचे स्वागत

युवक राष्ट्रवादीकडून बांद्यातील नूतन पोलीस निरीक्षकांचे स्वागत

बांदा

बांदा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक शामराव काळे यांचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस ठाण्यात स्वागत करण्यात आले. बांद्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्याबरोबर सार्वजनिक हिताच्या विषयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड यांनी येथे दिली.

यावेळी युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, असलम खतीब, विद्यार्थी सेलचे कौस्तुभ नाईक, अजहर खतीब आदी उपस्थित होते. यावेळी निरीक्षक काळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी निरीक्षक काळे यांनी सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा