You are currently viewing “माझा साहित्य प्रवास “साहित्यिकांनी विद्यार्थ्यांपुढे उलगडला

“माझा साहित्य प्रवास “साहित्यिकांनी विद्यार्थ्यांपुढे उलगडला

भोसरी- (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांतर्गत महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आणि लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यामंदिर व श्री टागोर माध्यमिक विद्यालय भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने “माझा साहित्य प्रवास” हा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, कार्यवाह संजय जगताप , कार्यकारिणी सदस्य किरण लाखे , प्राची कुलकर्णी , किरण जोशी व साहित्यिक गझलकारा मीना शिंदे,ज्येष्ठ कवी बाबु डिसूजा, कथालेखिका माधुरी डिसूजा, विलास वानखडे, हेमांगी बोंडे, राजेश चौधरी या बरोबरच श्री संजय शिंदे, श्री टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे, संस्थेचे सचिव सुरेश फलके, उपाध्यक्ष महेश घावटे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक हनुमंत आगे व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष काळे, दिलीप पाटील, शशिकांत ताटे, संतोष सुलाखे, माया पाटोळे, निवेदक सागर हिरवे, सूर्यकांत राठोड, एकनाथ जाधव, मनीषा सोनवणे, माधुरी बांडे हे शिक्षक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना भेटायला आलेल्या सर्व साहित्यिकांचे पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले. दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व साहित्यिकांचा परिचय मुलांना करून देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आपल्याला भेटायला आलेल्या व अनेक पुस्तके लिहिणारे कवी लेखक यांना भेटून विद्यार्थ्यांना आनंद झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत आगे सर यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे व कार्यवाह संजय जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठी भाषेचे महत्व त्यांनी आपल्या भाषणात विशद केले. विद्यार्थ्यांनीही लिहिण्याची व अभिव्यक्त होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सौ. माधुरी डिसोजा,मीना शिंदे,विलास वानखडे, हेमांगी बोंडे, राजेश चौधरी,बाबू डिसोजा यांनी आपला साहित्य प्रवास विद्यार्थ्यांसमोर सांगितला. कविता कशी सुचली ? ती प्रसिद्ध कशी झाली ? पुस्तक प्रकाशनाचा प्रवास कसा झाला ? लेखन कार्यातून मिळालेले पुरस्कार यावरती आपली मते मांडली. विद्यार्थ्यांच्या मनात पडलेले प्रश्न त्यांनी साहित्यिकांना विचारले आणि मराठी भाषेतील लेखनाविषयी उत्तरे जाणून घेतली. मराठीतील विनोदी वात्रटिका सादर करून संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने येत्या काळात शाळेमध्ये बाल साहित्य संमेलन घेण्याचे मानस आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठीतून स्वलिखित लेख, कविता यांचे हस्तलिखित तयार करावे व विद्यार्थी काव्यसंग्रह तयार करावा. त्यासाठी साहित्यिकांमार्फत मार्गदर्शन व कार्यशाळा घेण्यात येतील असे सांगण्यात आले.

निवेदक सागर हिरवे यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले तर माझा साहित्य प्रवास कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले.माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष काळे यांनी उपस्थितीबद्दल सर्व साहित्यिकांचे आभार मानले. जयश्री श्रीखंडे यांनी कार्यक्रमासाठी साहित्यिकांची नोंदणी केली. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष मा. राजन लाखे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यवेक्षक विलास पाटील सर व शिक्षणाधिकारी संजय नाईकडे साहेब यांनी दिलेल्या प्रेरणेतून हा कार्यक्रम घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − one =