You are currently viewing नवलराज विजयसिंह काळे(सिंधुदुर्ग) यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार जाहीर

नवलराज विजयसिंह काळे(सिंधुदुर्ग) यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार जाहीर

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी रजिस्टर ट्रस्ट यांच्या वतीने पुरस्कार जाहीर

24 डिसेंबर 2021 रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद 2021 या सोहळ्यात होणार पुरस्काराचे वितरण

वैभववाडी

नवलराज विजयसिंह काळे(सिंधुदुर्ग) यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी रजिस्टर ट्रस्ट यांच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद 2021 पुणे शहरात संपन्न होणाऱ्या पुरस्कार समारंभातील मानकऱ्यांच्या यादीत नवलराज काळे यांच्या 2014 पासून आत्ता पर्यंतच्या सर्व सामाजिक, राजकीय कार्याचा आढावा घेत त्यांच्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप असून संभारंभ अध्यक्ष पद्मश्री डॉ विजयकुमार शहा व इतर मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि. 24 डिसेंबर 2021 रोजी श्री स्वामी हॉल कोथरूड पुणे शहर येथे संपन्न होणार नवलराज काळे यांना या आधीही दोन पुरस्कार मिळाले आहेत. ओबीसी संघटनेचा महाराष्ट्र रत्न पदवी पुरस्कार व हेरिटेज प्रेरणा पुरस्कार लांजा रत्नागिरी. आता मिळालेला राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाज रत्न पुरस्कार 2021 हा तिसरा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.नवलराज काळे यांचे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा