You are currently viewing पोलीस निरीक्षकपदी कणकवली येथे सचिन आनंदराव हुंदळेकर यांची नियुक्ती

पोलीस निरीक्षकपदी कणकवली येथे सचिन आनंदराव हुंदळेकर यांची नियुक्ती

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षकपदापर्यंत च्या बदलीचे आदेश आज सायंकाळी उशिरा निर्गमित केले असून अजमुद्दीन मुल्ला यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर कणकवली पोलीस निरीक्षपदी तात्पुरती नियुक्ती देण्यात आलेले पी आय विजय यादव यांची आर्थिक गुन्हे शाखा पदी बदली झाली आहे.कणकवली पोलीस निरीक्षकपदी सावंतवाडी पोलीस निरीक्षकपदी तात्पुरत्या नियुक्तीस असलेल्या सचिन आनंदराव हुंदळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीनंतर सिंधुदुर्गातील जिल्ह्यांतर्गत बदलीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.केंद्रीयमंत्री राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेआधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पीआय मुल्ला हे सिक लिव्हवर होते.त्यांच्या जागेवर पोलीस निरीक्षक विजय यादव यांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदाच्या बदलीचे आदेश काढले. जिल्ह्यातील एकूण 30 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा