You are currently viewing युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्याची पोलीसांची कृती पक्षपातीपणाची

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्याची पोलीसांची कृती पक्षपातीपणाची

– जिल्हा काँग्रेस प्रवक्ते इर्शाद शेख

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत ही दरवाढ मागे घ्यावी यासाठी जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश परब यांनी शिरोडा येथे युवक काँग्रेस तर्फे घंटानाद आंदोलन करण्याचे जाहिर केले होते.परंतू पोलीसांनी त्यांना स्थानबद्ध करून वेंगुर्ला पोलीस स्टेशन येथे आणले. आपले मत मांडण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. आज जिल्ह्यामध्ये गर्दी जमवून मोठे कार्यक्रम केले जात आहेत त्यावर पोलीस यंत्रणा कोणतीही कारवाई करत नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर केलेली कारवाई ही हा आमच्यावर अन्याय आहे अश्या प्रकारे काँग्रेस पक्षाचा जनतेच्या हितासाठी उठवलेला आवाज कोणाच्या दबावाखाली दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला रस्त्यावर उतरून आक्रमक व्हावे लागेल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा