You are currently viewing जानवली जि.प. मतदारसंघात केंद्रीय मंत्री राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे झाले जल्लोषात स्वागत..!

जानवली जि.प. मतदारसंघात केंद्रीय मंत्री राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे झाले जल्लोषात स्वागत..!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केले अभिवादन

कणकवली

जानवली बिडवाडी जिल्हापरिषद मतदारसंघात जानवली मारुती मंदिर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.जिल्हा परिषद सदस्य श्रिया सावंत, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष रंजन राणे, जानवली सरपंच शुभदा रावराणे यांच्यासह मतदारसंघातीला सर्व सरपंच, उपसरपंच,सदस्य,भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते,यांनी श्री.राणे यांचे स्वागत केले.

कणकवली बुद्धविहार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरवात करण्यात आली.त्यानंतर ही यात्रा जानवली येथील मारुती मंदिर कडे थांबून श्री देव मारुतीचे दर्शन मंत्री राणे व पदाधिकाऱ्यांनी घेतले.यावेळी दीप ओवाळून आणि पुष्यवृष्टी करून मंत्री राणे यांचे स्वागत करण्यात आले.फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गरज करत या यात्रेचे स्वागत करण्यात आले.

यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशिष शेलार, माजी खासदार निलेश राणे,
आमदर प्रसाद लाड, आम.कालिदास कोळमकर, आ.नितेश राणे, माजी आमदार मधु चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, यात्रा प्रमुख प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेलीसुरेश सावंत, मिलींद मेस्त्री, संदीप सावंत, भगवान दळवी, स्वाती राणे, राजू हिरलेकर, दत्ता काटे, हरेश पाटील,श्री.पांचाळ,साकेडी सरपंच सौ.राणे, माजी सभापती संजय शिरसाट, आदी सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा