You are currently viewing सांगायचं कसं

सांगायचं कसं

गार गार वारा खुशाल अंगाशी झोंबताना,
शहारताना मन माझं मी सांगायचं कसं.

रुबाबदार मोरपीस शरीराशी खेळताना,
मनातल्या गुदगुल्या हृदयाशी बोलताना,
लाजऱ्या मनास माझ्या सावरायचं कसं,
शहारताना मन माझं मी सांगायचं कसं.

दवबिंदूं गवताच्या पात्यांवर झुलताना,
चमकणारे मोती अलवार न्याहाळताना,
विखुरताना मोत्यांना त्या पहायचं कसं,
शहारताना मन माझं मी सांगायचं कसं.

नकळत तुझा हात मज स्पर्शून जाताना,
नाजूक तुझा स्पर्श हवाहवासा वाटताना,
स्वप्नांना मिठीतून तुझ्या सोडवायचं कसं,
शहारताना मन माझं मी सांगायचं कसं.

उत्तर तुझ्या प्रश्नाचं मी हृदयात शोधताना,
ओठांची लाली ओठांच्या आड लपताना,
नसानसांत भिनलेलं प्रेम नाकारायचं कसं,
शहारताना मन माझं मी सांगायचं कसं.

गार गार वारा खुशाल अंगाशी झोंबताना…

{दिपी}✒️
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =