You are currently viewing वेंगुर्लेत अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन

वेंगुर्लेत अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन

कमलताई परुळेकर यांची उपस्थिती : 146 मोबाईल परत

वेंगुर्ले
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे महाराष्ट्रभर 1,05,592 मोबाईल परत करण्याचे आंदोलन 17 ऑगस्ट पासून सुरु आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारी वेंगुर्ले तालुक्यात मोबाईल वापसी आंदोलन करण्यात आले. कमलताई परुळेकर यांच्या उपस्थितीत यावेळी अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प अधिकारी शर्मिष्ठा सामंत यांच्याकडे 150 पैकी 146 मोबाईल परत केले. चार मोबाईल मागावून परत करण्यात येणार आहेत.

वेंगुर्लेतील या आंदोलनाबाबत बोलताना कमलताई परुळेकर म्हणाल्या की, सन 2017 मध्ये खरेदी केलेले हे मोबाईल 2 वर्षे गोडावून मध्ये राहिल्यानंतर मार्च 2019 ला अंगणवाडी सेविकांच्या हातात आला. पॅनासॉनिक कंपनीचा हा मोबाईल 2 जीबीचा असल्याने लाभार्थीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, कुपोषणा पासून आहारापर्यंत सर्व गोष्ठी यात सेव कराव्या लागतात. त्यामुळे हा मोबाईल हँग होतो. चार्जिग करताना गरम होतो. पोषण ट्रकर नावाचे चांगले ॲप शासनाने दिले. मात्र काहि सरकारी मोबाईल मध्ये ते डाऊनलोड होत नाहि. त्यामुळे खाजगी मोबाईल वापरण्याची सक्ती केली जाते. 599 तीमाहि रिचार्ज पैसे जरी मिळाले तरी न चालणाऱ्या मोबाईलवर ते भरावे लागतात मात्र खाजगी मोबाईलचे पैसे कोण भरणार? तसेच पोषण ट्रकर इंग्रजीत आहे.

इंग्रजी न जाणणाऱ्या सेविका आहेत. त्यांची अडचण होते. काहि दुरुस्ती करुन मागितल्यावर प्रश्नावली मराठीत मात्र उत्तरे इंग्रजीत. एखादे कुटुंब स्थलान्तरीत झाले तर डिलिट करण्याचा ऑपशन नाहि.. राज्यभाषा मराठी आहे. सर्व व्यवहार मराठीतन झाले पाहिजे असा कायदा आहे. त्यामुळे हे ट्रॅकर मराठीतून मिळावे हि मागणी अध्यक्ष, सचिव, आयुक्त या सर्वांना मान्य. पण पैसे कोणी घालायचे हा त्यांचा प्रश्न आहे. राज्यभरातील अंगणवाड्यांचे मुल्यमापन दिल्लीत पोहोचावे यासाठी हा मोबाईल पण त्याचा उपयोग होत नाहि. म्हणून हे मोबाईल आम्ही परत केले असल्याचे कमलताई परुळेकर यानी सांगितले.
23 ऑगस्ट पासून अंगणवाडी उघडून साडेतीन तास बसावे असे पत्र उप मुख्यकार्यकारी अधिकारी ( बालकल्याण ) यानी काढले आहे. मुलांना अंगणवाडी मध्ये बोलवायचे नाहि असे ते म्हणतात. अंगणवाडीची कामे घरी जावून घ्यावे लागते. गृहभेटी, गरोदर माता व स्तनदा माता, जन्म मृत्यू नोंद, सॅम मॅम नोंदणी, सीबीई कार्यक्रम, पोषण सप्ताह, हे सर्व घरी जावून करावे लागते. मग अंगणवाडीत साडे तीन तास बसून अंगणवाडी सेविकांनी काय माशा मारायच्या का ? असा सवालहि त्यांनी उपस्थित केला. यावेळी माधवी ठाकूर, मयुरी राणे, कवीता बुगडे, कांचन आरोलकर, मनिषा साळगावकर, संध्या कोनकर, इत्यादी बिट प्रमुख उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा