You are currently viewing देवगड तळेबजार येथे झालेल्या कार अपघातात चालकाचा मृत्यू

देवगड तळेबजार येथे झालेल्या कार अपघातात चालकाचा मृत्यू

देवगड

नांदगाव वरून देवगड च्या दिशेने येत असताना तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालय नजीक गोविंद सहदेव सारंग वय ५० (रा. टेंबवली कालवी ) यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला.  या अपघातात गोविंद सारंग यांचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना बुधवारी रात्री १०.१५ वा सुमारास घडली.

गोविंद सारंग हे आपल्या ताब्यातील वॅगनार कार. एम. एच ०७ क्यू ४४७४ या कारने मुली यशश्री हिच्यासोबत आपल्या टेंबवली कालवी येथील घरी येत असताना तळेबाजार भवानी मंगल कार्यालय नजीक गाडीवरील ताबा सुटून रस्त्यालगत असलेल्या कठड्याला आदळून गाडी पलटी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी यशश्री हिला देखील गंभीर दुखापत झाल्याने तिला अधिक उपचारासाठी देवगड येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गावासह अन्य आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच देवगड पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, वाहतूक पोलीस मिलिंद परब, अमित हळदणकर, दशरथ चव्हाण, प्रशांत जाधव आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. गोविंद सारंग कोटकामते हायस्कूल वर शिक्षक म्हणून आपली सेवा बजावत होते. तसेच टेंबवली ग्रामपंचायत सदस्य म्हणून देखील ते कार्यरत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा