You are currently viewing डेगवे गावातील कोविड योध्द्याचा सत्कार..!

डेगवे गावातील कोविड योध्द्याचा सत्कार..!

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावातील आशा सेविका सुजाता देसाई,अपर्णा सुतार तसेच डेगवे ग्रामपंचायतीचे कर्मचारी दादा देसाई यांचा “कोविड योध्दा”म्हणून डेगवे ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ.वैदेही देसाई यांच्या शुभहस्ते नुकताच डेगवे ग्रामपंचायत मध्ये पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन करण्यात आला.
यावेळी श्री. स्थापेश्वर वि.का.स सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुनील देसाई म्हणाले.डेगवे गावातील आशा सेविकांनी मानधनाची अपेक्षा न करता तन,व,मनाने दिवसरात्र करोना काळात सेवा केली आहे. म्हणून गावातील लोकांचे आरोग्य सुरक्षित राहिले आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.भर उन्हात व पावसाळ्यात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम केले आहे. म्हणून त्याच्या पाठीवर कौतुकाची आज थाप देताना आनंद वाटत आहेत.


यावेळी डेगवे ग्रामपंचायत माजी सरपंच मंगलदास ना.देसाई यांनी कोविड काळात जीवाची पर्वा न करता मानधना पेक्षा कामाला प्रथम दर्जा देत झटून काम करणाऱ्या डेगवे गावच्या आशा सेविका सुजाता देसाई आणि अपर्णा सुतार त्याच प्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी दादा देसाई याची “कोविड योद्धा” म्हणून कामगिरी कौतुकास्पद असल्याचे सांगितले.व त्यांचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे असे सांगितले .
यावेळी इतर डेगवे ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
सोबत:कार्यक्रमाचा फोटो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − six =