You are currently viewing ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक

ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती.

नारायण राणे यांना अटक केल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. रत्नागिरी पोलिसांकडून नारायण राणेंचा ताबा नाशिक पोलिसांकडे देण्यात येणार आहे. नाशिक पोलीस नारायण राणे यांना कोर्टात हजर करतील अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी दिली होती.

रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नारायण राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकणाकडे रवाना केलं आहे. जेणेकरुन जर नारायण राणे यांना अटक झाल्यास त्यांची जनआशीर्वाद यात्रा ही प्रवीण दरेकर पुढे चालवतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + four =