You are currently viewing तालुक्यात शिवसेना – युवासेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन

तालुक्यात शिवसेना – युवासेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन

कुडाळ

नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्री यांच्या बद्दल आक्षेपाहार्य विधान केले त्याचे पडसाद आज कुडाळ येथे उमटले आहेत. आज कुडाळ शिवसेना तालुक्याच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध केला आहे.

यावेळी शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेऊन कार्यकर्त्यांची धरपकड करून ताब्यात घेण्यात आले. यावेळी कार्यकर्ते आक्रमक असल्याचे निदर्शनास आले. यावेळी यापुढे आरे ला कारे अश्या पद्धतीत उत्तर दिले जाईल. असा इशारा मंदार शिरसाट यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, शिवसेना तालुका संघटक बबन बोबाटे, जि .प. सदस्य गटनेते नागेंद्र परब, युवासेनेचे तालुका प्रमुख योगेश धुरी, शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी, ओ .बी प्रमुख गवंडे, जि .प. सदस्य राजू कविटकर, आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा