You are currently viewing केंद्रीय उद्योगमंत्री नाम.नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील जनआशीर्वाद यात्रा दौरा जाहीर..

केंद्रीय उद्योगमंत्री नाम.नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील जनआशीर्वाद यात्रा दौरा जाहीर..

कणकवली

सिंधुदुर्गवासियांना उत्सुकता लागून असलेल्या केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची रुपरेषा जाहिर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग दौरा पुढीलप्रमाणे असेल.

२५ ऑगस्टला दुपारी ४ वाजता खारेपाटण येथे स्वागत. ४.४५ वाजता तळेरे येथे स्वागत. त्यानंतर सायंकाळी ५.३० वा. वैभववाडी येथे स्वागत आणि आत्मनिर्भर लाभार्थी भेट कार्यक्रम, सायं. ६.३० वाजता फोंडाघाट येथे स्वागत, सायं. ७.३० ते ८.३० वा. कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकात स्वागत, रात्री ८.४५ कणकवती बसस्थानकासमोर संपर्क कार्यालयात स्वागत, रात्री ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण आणि सकल मराठा समाजातर्फे स्वागत. रात्री ९.१५ ते ९.३० भाजप कार्यालय कणकवली येथे स्वागत.

जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी २६ रोजी सकाळी १० वाजता कणकवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार सकाळी १०.३० वा. नांदगाव येथे स्वागत. ११ ते ११.३० शिरगाव (ता. देवगड) येथे स्वागत, दुपारी १२ वा. तळेबाजार येथे स्वागत, दुपारी १२.३० वा. जामसंडे येथे स्वागत, उज्वला लाभार्थी, मच्छीमार, गुजराती बांधव तसेच ओबीसी शिष्टमंडळाशी भेट आणि स्वागतः दुपारी १.३० श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शन व त्यानंतर पूजन, दुपारी ३.१५ वा आचरा (ता.मालवण) येथे स्वागत, सायं. ४.१५ भरडनाका येथे स्वागत, सायं. ५ वा. चौके येथे स्वागत ५.० वा. कट्टा येथे स्वागत, सायंकाळी ६.१५ ओरोस तिठा येथे स्वागत, सायं. ७ वा. कुडाळ शहरात स्वागत, सायं. ७.४५ वा. कोलगाव (ता. सावंतवाडी) येथे स्वागत. रात्री ८.१५ वा. सावंतवाडी शहर येथे स्वागत.

२७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १०.१५ वा. वागदे येथील गोपुरी आश्रम येथील अप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण १०.४० ते ११.०० वा. कॉनबॅक संस्थेला भेट, एमआयडीसी कुडाळ येथे स्वागत. दु.१२ वा. बांदा येथे स्वागत, दु.२.३० वा. आडाळी (ता. दोडामार्ग) एमआयडीसी येथे पाहणी आणि स्वागत, दु.३.४० गांधी चौक दोडामार्ग येथे स्वागत, सायं. ४.३० वा. सातार्डा येथे स्वागत, सायं. ५ वा मळेवाड येथे स्वागत, सायं. ६ वा. शिरोडा येथे स्वागत, सायं. ६.३० वेंगुर्ले शहरात स्वागत.

अशा स्वरूपात ही जन आशीर्वाद यात्रा जाहिर करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे जनतेकडून आशीर्वाद घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − four =