You are currently viewing मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती जिल्हा परभणी यांचे वतीने आयोजीत

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती जिल्हा परभणी यांचे वतीने आयोजीत

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती जिल्हा परभणी यांचे वतीने आयोजीत

“मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव २०२३ – काव्य लिखाण स्पर्धा” उत्साहात संपन्न

दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. त्यानंतर, साधारण १३ महिन्यांनी हैद्राबाद संस्थान निजामाच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाले. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि सध्याचा तेलंगणा राज्याचा भूभाग हा हैद्राबाद संस्थानाच्या ताब्यात होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास आपणास सर्वश्रुत व्हावा, यासाठी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, परभणी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून समृद्ध मराठी साहित्याचा वारसा चालविणाऱ्या जगभरातील तमाम मराठी साहित्यिक – सारस्वत यांचे भव्य खुली काव्य लिखाण स्पर्धा दिनांक ११ ऑगस्ट २०२३ ते ५ सप्टेंबर २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने (ईमले व व्हाॅटसॅपद्वारे) घेण्यात आली होती.
सदर स्पर्धेस संपुर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आपल्या लेखणीने शब्द साहीत्य अमर करणारे कवी आणि कवियत्री या स्पर्धेत सहभागी झाले. काव्य लेखनासाठी दोन विषय म्हणजेच “मराठवाडा मुक्ती संग्राम स्फूर्ती गीत” किंवा “मराठवाडा गौरव गीत” हे ठेवण्यात आले होते. समितीने काही नियम व अटी देऊन सदर ऑनलाईन काव्य लिखाण स्पर्धा विनामुल्य स्वरुपात घेतली.
सदर स्पर्धेस सर्वश्री कवी संतोष जगताप – यवतमाळ, कवी देविदास शिंदे – अ.नगर, कवी महेश देशमुख – परभणी यांनी काव्य रचनांचे परीक्षण करुन दिनांक १५.०९.२०२३ रोजी निकाल दिला. स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. शारदा श्रीकृष्ण वानखेडे-चोपडे, परभणी यांच्या मराठवाडा गौरव गीत या रचनेस मिळाला. द्वितीय क्रमांक श्री. जयराम नारायण धोंगडे, नांदेड यांच्या मराठवाडा गझल या रचनेस मिळाला, तर तृतीय क्रमांक श्री. विकास घनश्याम गजापूरे, नागपूर यांच्या मराठवाडा स्फुर्ती गीत या काव्य रचनेस मिळाला. तसेच उत्तेजनार्थ म्हणुन श्री. चंद्रशेखर शिवशंकर काकांडीकर, परभणी आणि सौ. माधवी नितीन देवळाणकर, पुणे यांच्या रचनांना सन्मान मिळाला.
स्पर्धेचे पुरस्कार वितरण दिनांक १७ स्प्टेंबर २०२३ रोजी परभणी येथे आयोजीत करण्यात आला. सदर कार्यक्रमात विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व राेख रक्कम, अनुक्रमे रु.३०००/-, रु.२०००/-, रु.१०००/- व उत्तेजनार्थ पुरस्कार रक्कम प्रत्येकी रु.५००/- अशा स्वरुपात देण्यात आली. पुरस्कार वितरण सोहळा पार्वती मंगल कार्यालय, परभणी येथे मा. डॉ केदारजी खटिंग,संघचालक रा स्व संघ परभणी,मा.श्री आबासाहेब देशपांडे, सहकार भारती चे जेष्ठ अ.भा.कार्यकर्ते व मा.डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, प्र.कुलगुरु, स्वामी रामानंद विदयापीठ, नांदेड .श्री अनिलजी अष्टुरकर यांचे हस्ते पार पाडला. सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपुर्वक ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती, जिल्हा परभणी चे अध्यक्ष श्री स्वप्नील पत्तेवार, उपाध्यक्ष श्री अंकुश अग्रवाल, प्रमुख मार्गदर्शक श्री सुरेश देशमुख, स्पर्धा संयाेजक श्री गणेश शिवलाड यांनी परिश्रम केले.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + fourteen =