You are currently viewing शिवसेना कणकवली शहरप्रमुखपदी उमेश वाळके तर उपतालुकाप्रमुखपदी महेश कोदे

शिवसेना कणकवली शहरप्रमुखपदी उमेश वाळके तर उपतालुकाप्रमुखपदी महेश कोदे

शिवसेना कणकवली शहर नूतन कार्यकारिणीची निवड

कणकवली

शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीत काही बदल करून नूतन कार्यकारिणीची निवड आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी जाहीर केली आहे.

यामध्ये कणकवली शिवसेना शहरप्रमुखपदी उमेश वाळके, शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी महेश कोदे, उपतालुकाप्रमुख पदी सोमा गायकवाड, उपतालुकाप्रमुख पदी अजित काणेकर, उपतालुकाप्रमुख पदी राजन म्हाडगुत, शिवसेना उपशहरप्रमुख पदी प्रमोद मसुरकर,उपशहरप्रमुख पदी संतोष पुजारे, उपशहरप्रमुख पदी वैभव मालंडकर, उपशहरप्रमुख पदी जोगेश राणे, महिला उपशहरप्रमुख पदी दिव्या साळगावकर, युवासेना तालुका संघटक गौरव हर्णे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. येत्या काळात विभागवार बैठक घेऊन त्या त्या विभागात नवीन कार्यकर्त्यांना संघटनेत संधी देण्यात येणार असल्याचे यावेळी शिवसेना नेत्यांनी संगितले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, नगरसेवक कन्हैया पारकर,रुपेश नार्वेकर, युवासेना जिल्हा समन्वयक गीतेश कडू, राजू राठोड,युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, युवासेना समन्वयक तेजस राणे,सिद्धेश राणे, युवासेना शहर प्रमुख आदित्य सापळे, सोहम वाळके, वागदे सरपंच रुपेश आमडोस्कर, संतोष परब, विलास जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा