You are currently viewing बांदा बसस्थानकात कायस्वरुपी स्वच्छता कामगार न दिल्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस सावंतवाडी आगारात देतील धडक

बांदा बसस्थानकात कायस्वरुपी स्वच्छता कामगार न दिल्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस सावंतवाडी आगारात देतील धडक

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवींनी दिला इशारा

सावंतवाडी

कोकणातला सरवात मोठा सण गणेशोत्सव अवघ्या २० ते २२ दिवसानवर असताना बांदा स्थानकामध्ये घाणिचे सामराज्य पसरले आहे.स्वच्छता ग्रुहाची सफाई नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड, सावंतवाडी तालुका सोशल मीडीया अध्यक्ष संजय भाईप यांनी पदाधीकारी कार्यकरत्यासंह बांदा बस स्थानकाची पहाणी केली.

यासंदर्भात बांदा बस स्थानक प्रमुख प्रकाश नार्वेकर यांची भेट घेवुन चर्चा केली असता नार्वेकर यांनी बांदा स्थानकात आठ दिवसानी एकदा सफाई कामगार येतो आपण वेळोवेळी कायमस्वरुपी कामगाराची मागणी केली आहे.त्याची पुर्तता करण्यात येत नसल्याचे सांगीतले. पुंडलिक दळवी यांनी दुरध्वनीवरुन सावंतवाडी आगार प्रमुख वैभव पडोळे यांच्याशी संपर्क साधला असता दररोज दोन तास कायमस्वरुपी सफाई कामगार देण्याचे आश्वासन दिले. कायम स्वरुपी सफाई कामगार दोन दिवसात न दिल्यास राष्ट्रवादी पदाधीकारी कार्यकर्ते सावंतवाडी आगारात धडक देतील असा निर्वाणीचा ईशारा यावेळी देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा