You are currently viewing जिल्ह्यात एकुण 361 सक्रीय कंटेन्मेंट झोन..

जिल्ह्यात एकुण 361 सक्रीय कंटेन्मेंट झोन..

वैभववाडी तालुक्यात एकही कंटेन्मेंट झोन नाही  

सिंधुदुर्गनगरी :- 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी एकुण 361 ठिकाणी सक्रीय कंटेन्मेंट झोन आहेत. सर्वाधिक 135 कंटेन्मेंट झोन कणकवली तालुक्यात आहेत. तर वैभववाडी तालुक्यात एकही कंटेन्मेंट झोन नाही. महसूल उप विभाग व तालुका निहाय कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत.

            1) देवगड  तालुका  23 कंटेन्मेंट झोन, 2) कणकवली  तालुका  135 कंटेन्मेंट झोन, 3) वैभववाडी   तालुका  0 कंटेन्मेंट झोन, कणकवली  महसूल उप विभाग एकुण 158 कंटेन्मेंट झोन, 1) मालवण  तालुका  45 कंटेन्मेंट झोन, 2) कुडाळ  तालुका  86 कंटेन्मेंट झोन, कुडाळ  महसूल उप विभाग एकुण 131 कंटेन्मेंट झोन, तर  1) वेंगुर्ला  तालुका  12  कंटेन्मेंट झोन, 2) सावंतवाडी  तालुका  43  कंटेन्मेंट झोन, 3) दोडामार्ग  तालुका  17 कंटेन्मेंट झोन, सावंतवाडी महसूल उप विभाग एकुण 72 कंटेन्मेंट झोन, आहेत.

            जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 1 हजार 21 कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यात 304 सर्वाधिक असून त्यानंतर कुडाळ- 219, सावंतवाडी -197, मालवण-115, देवगड-72, दोडामार्ग-57, वेंगुर्ला-45 आणि वैभववाडी- 12 याप्रमाणे कंटेन्मेंट झोन लागू केले आहेत. यापैकी 660 कंटेन्मेंट झोन उठविले असून त्यामध्ये कणकवली तालुक्यातील 169, देवगड-49, वैभववाडी-12 मालवण-70 कुडाळ-133, वेंगुर्ला-33, सावंतवाडी-154 व दोडामार्ग तालुक्यातील 40 कंटेन्मेंट झोन उठविण्यात आले आहेत.

            आज रोजी एकुण 33 कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आले आहेत. त्यामध्ये कणकवली-17, मालवण-5, कुडाळ-9 व वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यात प्रत्येकी 1 कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 12 =