You are currently viewing छोटे दिल से कोई बडा नही होता!

छोटे दिल से कोई बडा नही होता!

….राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्राप्रमुख श्री प्रमोद जठारांचा खासदार विनायक राऊतांना टोला

स्वातंत्र्यवीर सावरकर, लो.टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय अटलजी, स्व.बाळासाहेब ठाकरे आदी विभूती या कोणा एकाची खाजगी मालकी नसते तर तो राष्ट्राचा जाज्वल्य वारसा असतो. यांच्या स्मृती स्थळांचा वारसा देशातीलच काय तर जगातील कोणीही घेऊ शकतो. शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनीही अशीच भावना व्यक्त केली आहे. वयाने छोटे असले तरी आदित्य ठाकरेंपासून तुम्ही हे शिकण्यासारखे आहे, विनायक राऊत साहेब! छोट्या आदित्य ठाकरेंकडून मोठ्या दिलाची अक्कल शिका. उगाच मनाचा कोतेपणा दाखवून स्व.बाळासाहेबांची उंची कमी करू नका. छोटे दिल से कोई बडा नही होता, एवढं लक्षात घेऊन वाटचाल करा, मग तुमच्याही खासदारकीचा महाराष्ट्राच्या विकासाला फायदा होईल असा सल्ला नारायणराव राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे प्रमुख आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊतांना दिला आहे.

स्व.बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत, हिंदूहृदयसम्राट आहेत. त्यांचे स्मारक हे “शिवतीर्थ” आहे आणि कोणीही त्याचे दर्शन घेऊ शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागून आता तुमची मनं कोती आणि छोटी झाली आहेत. राजकारणात मतभेद असतातच. जसे ते राज ठाकरे आणि बाळासाहेबांमध्ये होते, नारायणराव राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होते. पण यांच्यामध्ये मतभेद असले तरी मनभेद नव्हते हे आजवर अनेकदा स्पष्ट झालं आहे. शिवतीर्थाला भेट ठरवत नारायणराव राणेंनीही बाळासाहेबांप्रतीचा आदर आणि आपल्या नेक दिलाचे दर्शन घडवले आहे. राजकारण हे महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादासाठीच असावे, महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठीच्या बाष्कळ बोलघेवडेपणाचे नसावे असा सणसणीत टोला प्रमोद जठार यांनी विनायक राऊतांना लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा