You are currently viewing आंगणेवाडी नियोजनासाठी जिल्हाधिकारी यांनी घेतली बैठक

आंगणेवाडी नियोजनासाठी जिल्हाधिकारी यांनी घेतली बैठक

आंगणे कुटुंबीय, प्रशासन होते उपस्थित;यात्रा यशस्वितेसाठी सहकार्य करण्याचे सर्व विभागांना दिले आदेश

मालवण

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीचा यात्रोत्सव अवघ्या दहा दिवसावर येऊन ठेपल्याने आज आंगणेवाडी येथे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आंगणे कुटुंबीय आणि प्रशासकीय यंत्रणेतील नियोजना संदर्भात आढावा बैठक घेतली. या आढाव बैठकीत यात्रोत्सव सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आंगणे कुटुंबीय यांना प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन करतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पोलीस, वीज, दूरध्वनी, ग्रामपंचायत, नगरपालिका, एसटी महामंडळ, बांधकाम विभाग, आरोग्य, पाणीपुरवठा यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

आंगणेवाडी येथे आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आंगणेवाडी यात्रोत्सव नियोजनाची आढावा बैठक घेतली. यावेळी जि. प चे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित नायर, मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील, बांधकाम विभागाचे अजित पाटील, गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे भास्कर आंगणे पोलीस निरीक्षक विजय यादव,आचरे उपनिरीक्षक सय्यद आदी व इतर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − seventeen =