You are currently viewing सावंतवाडीत सुरू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यावर कारवाई करा – आशिष सुभेदार

सावंतवाडीत सुरू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यावर कारवाई करा – आशिष सुभेदार

मनसे नेते परशुराम उपरकर सोमवारी घेणार डीवायएसपींची भेट

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यात व शहरात गेले काही दिवस जुगार व मटक्याचे अड्डे राजरोसपणे सुरू आहे याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे अशा तक्रारी काही ज्येष्ठ नागरिकांकडून आमच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे या अड्ड्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे आक्रमक भूमिका घेणार आहे. सोमवार दिनांक 26 रोजी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर डी वाय एस पी रोहिणी सोळंके यांच्या भेट घेणार आहेत.

सद्यस्थितीत शहरात अनेक ठिकाणी नाक्या नाक्यावर मटका बुकिंगची संख्या वाढली आहे राजरोसपणे त्या ठिकाणी जाऊन शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी पैसे खर्च करताना दिसत आहेत.अंमली पदार्थ आणी दारूच्या आहारी गेल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा प्रकार तात्काळ थांबवावा.

दोन दिवसांपूर्वी मळगाव येथे जुगार अड्डा सुरू अशी बातमी सोशल मीडियावर फीरत होती याकडे स्थानिक पोलिसांनी काय भूमिका घेतली याचे उत्तर द्यावे.

नवनिर्वाचित पोलीस अधिकारी फुलचंद मेंगडे यांनी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील काही दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना चाप बसला आहे ही कौतुकाची गोष्ट आहे यापुढेही त्यांनी असेच कारवाई सातत्य ठेवावे आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार व मटका अड्ड्यावर कारवाई करावी या मागणीसाठी मनसेचे नेते परशुराम उपरकर सोमवारी सावंतवाडीत येणार असून डी वाय एस पी ची भेट घेणार आहे त्यानंतर नियोजन करून ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मनसे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =