चहा प्रेमींसाठी खुशखबर
चहाच्या नवनवीन चवींमुळे आणि वेगवेगळ्या कंपनींच्या कमी दरातील उत्तम प्रतीच्या चहामुळे चहा पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांची चहाची नवनवी दालने खुली होत आहेत. या कंपनींचा चहा पिल्याने तोंडात चिकटपणा येत नाही आणि चहाची चव तोंडात रेंगाळत राहते. त्यामुळे आवर्जून चहाचे शौकीन असा उत्तम दर्जाचा चहा पिण्यासाठी थांबतात.
रेडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू नवयुवक कु.ऋचिकेत तिवरेकर याने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा असा व्यवसाय सुरू केला. सावंतवाडी शहरातील जुना शिरोडा नाका येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत “चहाचा चार्जिंग पॉईंट” या टॅग लाईनने “आरोग्य अमृततुल्य” या चहाच्या नाविन्यपूर्ण ब्रँडची २२७ वी शाखा सुरू केली. त्याच्या या व्यवसायात त्याला त्याचे वडील रेडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक द्वारकानाथ तिवरेकर यांनी मोलाची साथ दिली. आजकाल बरीचशी नवी पिढी झटपट पैशांच्या मागे लागून व्यसने, अवैध धंद्यांकडे वळत आहे, अशा नवयुवकांना ऋचिकेत तिवरेकर यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. मेहनत आणि चिकाटीने कोणताही व्यवसाय केला तर नक्कीच त्यात यश मिळते त्यासाठी गरज असते ती जिद्दीची. अशीच व्यवसाय करण्याची जिद्द बाळगत सावंतवाडीत सुरू केलेल्या आरोग्य अमृततुल्य चहाचा सर्वांनी स्वाद घ्यावा असे आवाहन ऋचिकेत याने केले आहे.
आरोग्य अमृततुल्यच्या नव्या दालनाचे उद्घाटन सावंतवाडीचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते फित कापून झाले, प्रमुख पाहुणे म्हणून रेडी जि.प. सदस्य प्रितेश राऊळ उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी रेडी सरपंच रामसिंग राऊळ, सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, बांधकाम व्यावसायिक दीपक पटेकर, माजी नगरसेवक देवा टेमकर, शैलेश तिवरेकर, श्रीपाद तिवरेकर, द्वारकानाथ तिवरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.