You are currently viewing शिरोडा गांधी स्मारकासाठी नियोजित जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात मिळावी

शिरोडा गांधी स्मारकासाठी नियोजित जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात मिळावी

माजी खासदार निलेश राणे यांना सरपंच मनोज उगवेकर यांचे निवेदन

वेंगुर्ल

तालुक्यातील शिरोडा मिठागर येथील राष्ट्पिता महात्मा गांधी यांच्या स्मरकासाठीची नियोजित जागा शिरोडा ग्रामपंचायत कडे हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावावर पुढील कारवाई होण्यासाठी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, जि.प. सदस्य प्रितेश राऊळ, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे यांनी माजी खासदार तथा भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

या निवेदनात असे म्हटले आहे की, येथील गट नं. ३७/१ क्षेत्र ०२.७२.०० हेक्टर आर शासकिय जमिन सातबारा सॉल्ट डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नावे दाखल आहे. या जमिनीपैकी ५० गुंठे जमिन ग्रामपंचायतीने नियोजित महात्मा गांधी स्मारकाचे बांधकाम करण्यासाठी हस्तांतरीत करुन मिळावी अशी मागणी केलेली आहे. तात्कालीन केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू यांनी ग्रा.प. शिरोडयाच्या मागणी प्रमाणे ती जमिन शिरोडा ग्रा.प ला हस्तांतरीत करण्यासाठी सॉल्ट डिपार्टमेंट दिल्ली यांना आदेश दिले होते.

ही जमिन ग्रामपंचायत नावे हस्तांतरीत करण्याबाबत सॉल्ट डीपार्टमेंटने तयारी दर्शविली आहे. तसे त्याचे पत्रही आहे. दरम्यान हा प्रस्ताव व ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत सॉल्ट डीपार्टमेंट सेंट्रल गव्हरमेंट नवी दिल्ली यांचेकडे पाठविण्यात यावा असे त्यांचे म्हणणे आहे. तरी त्याप्रमाणे नियोजित महात्मा गांधी स्मारक बांधणे बाबत प्रस्ताव मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग यांच्या मार्फत दि. २३/०१/२०२० रोजी ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तो प्रस्ताव मंजूर होणेबाबत अद्याप पर्यंत कोणतीही पुढील कार्यवाही झालेली नाही. तरी याबाबत आपल्या स्तरावरून योग्य तो प्रयत्न व्हावा अशी विनंती निवेदनाद्वारे माजी खासदार निलेश राणे यांना करण्यात आली आहे. यावेळी आनंद शिरवलकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =