You are currently viewing कु. भाग्यश्री मोहिते हीचे शिवशंभू संघटनेकडून अभिनंदन

कु. भाग्यश्री मोहिते हीचे शिवशंभू संघटनेकडून अभिनंदन

सिंधुदुर्ग :

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा ऐतिहासिक दिनविशेष शिवशंभु संघटनेच्या माध्यमातून कु. भाग्यश्री मोहिते आपल्या कणखर व बाणेदार आवाजातील व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग ऐतिहासिक घटना यांचे थोडक्यात वर्णन केले जाते. त्या त्यादिवशी ची घटना प्रसंग सांगितला जातो.यामुळे शिवप्रेमींना दैनंदिन शिवचरित्रातील ठळक घटना प्रसंग समाज माध्यमातून समजतात. त्यामुळे अनेकांना दिनविशेष मधून शिवचरित्र अभ्यासपूर्ण माहिती मिळत असून या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्याचा शिवशंभु संघटना सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिवकन्या कु. भाग्यश्री मोहिते यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा