You are currently viewing मालवणात २५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

मालवणात २५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

मालवणात २५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

मालवण

लायन्स क्लब मालवण, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स पुरस्कृत अॅपल सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ मे रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात उच्च रक्तदाब, ब्लड कँसर, मधुमेह, थायरॉईड, हृदय, पोट व मेंदू विकार, किडनीचे आजार, स्त्री रोग, लहान मुलांचे आजार आदी व इतर आजारांबाबत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात कोल्हापूरच्या प्रसिद्ध अॅपल सरस्वती हॉस्पिटलचे 20 डॉक्टर सहभागी होणार आहेत या शिबिराच्या अधिक माहितीसाठी अनुष्का चव्हाण ९४०४५४६३३७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा