You are currently viewing कुडाळ शहर परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य!

कुडाळ शहर परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य!

अधिकारी व रिक्षाचालकांची मंगळवारी होणार बैठक

कुडाळ शहर परिसरातील खड्डेमय रस्त्यांविरोधात कुडाळ मधील रिक्षा व्यावसायिक एकवटले आहेत. खड्ड्यांमध्ये लाल दगड घालून प्रवाशांच्या डोळ्यात धूळफेक करू नका, आम्हाला कायमस्वरूपी व दर्जेदार उपाय योजना हवी, अशी मागणी भाजप रिक्षा चालक-मालक संघटना यांनी कुडाळ पोलीस अधीक्षक कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्या समवेत झालेल्या चर्चेत सार्वजनिक बांधकाम विभाग व रिक्षा चालक यांची आज मंगळवारी एकत्रित बैठक होऊन चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.

अभिमन्यू हॉटेल ते पिंगुळी रस्ता, पोलीस स्टेशन ते आर एस एन हॉटेल रस्ता, रेल्वे स्टेशन रस्ता, पोस्ट ऑफिस ते नेरूरपार रस्ता, पोस्ट ऑफिस ते वालावल रस्ता, आंबेडकर पुतळा ते कविलकाटे रस्ता, असे अनेक रस्ते व तालुक्यातील सर्व रस्ते पूर्णपणे खराब असून त्याकडे कोणाचेही लक्ष नाही, असे निवेदनात म्हटले आहे. वेळोवेळी निवेदन भेटीगाठी घेऊनही या कडे सार्वजनिक बांधकाम विभाग खाते दुर्लक्ष करीत आहे.

वरील लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष विलास वराडकर, यांच्यासह अ रिक्षा युनियनचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. धूळफेक करू नका. तसेच आम्हाला कायमस्वरूपी व दर्जेदार उपाय योजना हवी आहे. अशी मागणी भाजप रिक्षा चालक-मालक संघटना यांनी कुडाळ पोलीस अधीक्षक कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्या समवेत झालेल्या चर्चेत सार्वजनिक बांधकाम विभाग व रिक्षा चालक यांची आज मंगळवारी एकत्रित बैठक होऊन चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.

अभिमन्यू हॉटेल ते पिंगुळी रस्ता, पोलीस स्टेशन ते आर एस एन हॉटेल रस्ता, रेल्वे स्टेशन रस्ता, पोस्ट ऑफिस ते नेरूरपार रस्ता, पोस्ट ऑफिस ते वालावल रस्ता, आंबेडकर पुतळा ते कविलकाटे रस्ता, असे अनेक रस्ते व तालुक्यातील सर्व रस्ते पूर्णपणे खराब असून त्याकडे कोणाचेही लक्ष नाही, असे निवेदनात म्हटले आहे. वेळोवेळी निवेदन भेटीगाठी घेऊनही या कडे सार्वजनिक बांधकाम विभाग खाते दुर्लक्ष करीत आहे.

वरील लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष विलास वराडकर, यांच्यासह अ रिक्षा युनियनचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 3 =