You are currently viewing तळाशील ग्रामस्थांचे उपोषण अखेर मागे

तळाशील ग्रामस्थांचे उपोषण अखेर मागे

ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांना दिलेला शब्द पाळला

तळाशील येथे कालपासून सुरु असलेल्या ग्रामस्थांच्या उपोषणाला आमदार वैभव नाईक यांनी आज पुन्हा भेट देऊन तळाशील मध्ये मंजूर झालेले बंधारे तसेच उर्वरित बंधाऱ्यासाठी सुरु असलेल्या निधीच्या तरतूदीबाबत ग्रामस्थांना माहिती दिली होती. तळाशील येथील वाळू उत्खननावर देखील बंदी आणण्यासाठी मुंबईतील मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याची भूमिका मांडली होती. त्यावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आज सायंकाळी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्याची ग्वाही आ. वैभव नाईक यांना दिली होती. अखेर आ. वैभव नाईक यांच्यावर विश्वास ठेवून तळाशील वासीयांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा