You are currently viewing वैभववाडीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

वैभववाडीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी यांचा करण्यात आला सन्मान

वैभववाडी

आज भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाची सुरुवात झाली. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण देशभरात साजरा होत आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी वीर योद्धयांनी खडतर संघर्ष करुन, हौतात्म्य पत्करले त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले जात आहे तर काही दिवसांपूर्वी ऑलिंपिक स्पर्धेत भारताला अनेक पदके मिळवून देणाऱ्या खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे देशातील शाळांच्या परीसरात विद्यार्थ्यांच्या अभावामुळे पुर्वी प्रमाणे उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले नाही.
वैभववाडी तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालये,शाळा यांमध्ये ध्वाजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वैभववाडी तहसीलदार कार्यालयात वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
कोरोना काळात वैभववाडी तालुक्यातील जनतेने व लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्यामुळे उत्तम रीतीने आम्हाला कार्य करू शकलो आणि म्हणूनच आपल्या सहकाऱ्यामुळे उत्कृष्ट तहसीलदार म्हणून जिल्ह्यास्तरावर मला गौरविण्यात आले. यापुढे देखील आपले आपल्या सर्वांचे सहकार्य आम्हाला मिळाले असे मत तहसीलदार रामदास झळके यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वैभववाडी तालुक्यात कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलिस निरीक्षक अतुल जाधव, नायब तहसीलदार श्री. नाईक व श्री. निंबाळकर, मंडल अधिकारी पावसकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल पवार, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांचा तहसीलदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल पवार यांचा वैभववाडी तालुक्याच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या वतीने सचिव प्रमोद रावराणे यांनी तहसीलदार रामदास झळके यांना ‘रावराणे कृलवृत्तांत’ पुस्तक भेट म्हणून दिले.

यावेळी नायब तहसीलदार रामदास झळके, श्री. नाईक, श्री. निंबाळकर वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, वाभवे वैभववाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुरज कांबळे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, नासिर काझी, स्नेहलता चोरगे, प्रमोद रावराणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, बाप्पी मांजरेकर, बाळा हरयाण, बंड्या मांजरेकर, सज्जनकाका रावराणे, प्राची तावडे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर कदम, मनोज सावंत, मुख्याध्यापक नादकर सर, प्रा. एस. एन. पाटील तसेच पोलिस कर्मचारी, एन. सी. सी. पथक, वैभववाडी तालुक्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =