You are currently viewing शरदचंद्र पवार यांच्या निवासस्थानावरील दगडफेक घटनेचा निषेध 

शरदचंद्र पवार यांच्या निवासस्थानावरील दगडफेक घटनेचा निषेध 

 

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

इचलकरंजी येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आज शनिवारी मलाबादे चौकात राज्याचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या दगडफेक घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला.तसेच या प्रकरणातील संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी ,अशी मागणी करुन या मागणीचे निवेदन डिवायएसपी बी.बी.महामुनी यांच्याकडे सादर करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करीत होते. तसेच हा वाद न्यायालयात गेला होता. यावर गुरुवारी ७ एप्रिल २०२२ रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सदरचे बेमुदत कामबंद आंदोलन स्थगित होईल, असे चित्र निर्माण झाले होते. तसेच कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून, मिठाई वाटून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. परंतू काल शुक्रवारी ८ एप्रिल २०२२ रोजी दुपारी अचानक काही लोकांचा समूह मुंबई येथील शरदचंद्र पवार यांच्या निवासस्थानावर चालून गेला. तसेच त्या समूहाकडून सदर निवासस्थानावर दगडफेक करुन मोठे नुकसान करण्यात आले.

या घटनेचा राज्यभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत असून यातील संबंधितांवर पोलीस प्रशासनाने तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून होत आहे. याच अनुषंगाने इचलकरंजी येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी मलाबादे चौकात राज्याचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या दगडफेक घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सदर प्रकरणातील संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करुन या करण्यात आली. यावेळी सदर मागणीचे निवेदन डिवायएसपी बी.बी. महामुनी यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी इचलकरंजी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू ताशिलदार उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश पाटील, युवक शहराध्यक्ष अभिजित रवंदे, माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे, प्रधान माळी, अब्राहम आवळे, मंगेश कांबुरे, संतोष शेळके , संजय बेडक्याळे, अमित गाताडे, दीपा पुजारी, नागेश शेजाळे , सलीम ढालाईत, सादिक मुजावर, मच्छिन्द्र नगारे, सुनील मुधाळकर,सलीम मुजावर, निखिल जमाले, आनंदा कांबळे, विठ्ठल चौगुले, स्वागत लोकरे, विवेक चोपडे, अनिल पाटील,  निशिकांत पाटील, अमोल कदम, अनिकेत धुमाळ, नागेश पाटील, पिंटू दोरकर, जोतिराम साळुंखे, अमित कांबळे, गणेश सावरतकर, दिलावर पटेल, योगेश चौगुले, अथर्व जाधव, विकास मकोटे , स्वप्नील पाथरवट , विष्णू देढे , प्रकाश बरकाळे, शहाजहान टकळकी, युसूफ दुर्गग, युवराज जाधव, संभाजी सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =