You are currently viewing सावंतवाडीत १८ ऑगस्टला रक्तदान शिबीर

सावंतवाडीत १८ ऑगस्टला रक्तदान शिबीर

सद्या कोरोना परिस्थितीमु़ळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून ओरोस व सावंतवाडी रक्तपेढीमध्ये सामान्य रक्तगटाची एक रक्तबॅग मिळवणे रुग्णाच्या नातेवाईकांना मुश्किल होत आहे. त्यामुळे रक्ताअभावी होणारी रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी १८ ऑगस्ट २०२१ रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सावंतवाडीतील समाजसेवक कै. बाळाभाई बांदेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या या रक्तदान शिबिराला सकाळी १० वाजल्यापासून सुरवात होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिरात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे त्यासाठी रक्तदात्यांनी देव्या सुर्याजी – 9922088238 आणि रो अँड. सिध्दार्थ भांबूरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि युवा रक्तदाता संघटनेने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 10 =