You are currently viewing जनता कर्फ्यू ला कणकवलीकरांची उत्तम साथ; ह्यापुढेही अशीच साथ द्या

जनता कर्फ्यू ला कणकवलीकरांची उत्तम साथ; ह्यापुढेही अशीच साथ द्या

नक्कीच कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ – नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली
शहरात गेले दोन दिवस सर्वांच्या साथीने जनता कर्फ्यु यशस्वी झाला. शहरवासीय,व्यापारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, नगरसेवक,पदाधिकारी आदींनी सहकार्य केले तसेच सहकार्य अजून पुढील सहा दिवस करून हा आठ दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी करूया. शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येतील वाढ रोखण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे.
सर्व नागरिक, व्यापारी, सर्व नगरसेवक व विविध संघटनांच्या जोरावरच हा निर्णय गेले दोन दिवस यशस्वी झाला आहे. यापुढेही नगरपंचायतला आपणा सर्वांची साथ आवश्यक आहे. गेल्या दोन दिवसांच्या यशस्वी जनता कर्फ्युमुळे जिल्ह्यात कणकवलीवासीयांच्या एकीचे दर्शन झाले आहे. कोरोनाच्या मागील सात महिन्यांच्या काळात वेळोवेळी केलेल्या आवाहनाला कणकवलीवासीयांनी साथ दिली आहे तशीच साथ अजून पुढील सहा दिवस द्या असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलालडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + sixteen =