You are currently viewing लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित मान्सून महोत्सव २०२३

लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित मान्सून महोत्सव २०२३

उद्या १३ ऑगस्ट रोजी आमने-सामने तिरंगी डबलबारी भजन सामना

 

कुडाळ:

 

आज शनिवारी सायंकाळी कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल येथे लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित मान्सून महोत्सव २०२३ चा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्या दिवशी संयुक्त दशावतारचे ब्रम्हतेज या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. उद्या रविवार दि.१३ ऑगस्ट रोजी सायं. ६.३० वाजता आमने-सामने तिरंगी डबलबारी भजन सामना होणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, लाजरी क्रिकेट ग्रुप अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश म्हाडेश्वर, संजय करलकर, रूपेश पावसकर, देवेंद्र नाईक, संजय मांजरेकर, गजानन गावस, प्रसाद परब, दशावतारी कलावंत बाबा मेस्त्री, सिद्धेश कलिंगण, स्वरूप सावंत, दिपक भोगटे, सिद्धेश वर्दम, मंजू फडके, बाबा कांदळगावकर, भाऊ पाटणकर, पप्पू नांदोसकर आदींसह लाजरी क्रिकेट ग्रुपचे सदस्य व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

तहसीलदार पाठक, गटविकास अधिकारी चव्हाण यांनी लाजरी क्रिकेट ग्रुपच्या उपक्रमांचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयोजक मंडळाच्या वतीने अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश म्हाडेश्वर व अन्य सदस्यांनी केला. सुत्रसंचालन बादल चौधरी व राजा यांनी केले

प्रतिक्रिया व्यक्त करा