You are currently viewing रुग्णवाहिकेसाठी आमरण उपोषण

रुग्णवाहिकेसाठी आमरण उपोषण

आश्वासनाची पूर्तता न झाल्याने प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

दोडामार्ग

साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वारंवार मागणी करुन सुद्धा रुग्णवाहिका मिळत नसल्याने आज पासून आमरण उपोषणला सुरुवात करण्यात आली आहे.दरम्यान सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
यावेळी साटेली भेडशी सरपंच लखु खरवत, साटेली भेडशी उप सरपंच गणपत डांगी, सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई, क्षितीज मणेरकर आदी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी भर पावसात पं.स.दोडामार्ग येथे या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले होते.यावेळी १५ दिवसात रुग्णवाहिका दिली जाईल,असे आश्वासन देऊनही त्या आश्वासनांची पुर्तता न झाल्याने आज पुन्हा एकदा आरोग्य केंद्रासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा