You are currently viewing मनसेकडून ओटवणे व सरमळे गावातील पूरग्रस्तांना मदतकार्य

मनसेकडून ओटवणे व सरमळे गावातील पूरग्रस्तांना मदतकार्य

कुडाळ तालुका मनसेच्या माध्यमातून पुरग्रस्तांची सेवा

मनसे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार व संतोष भैरवकर यांच्या विनंतीवरून दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्याच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे व सरमळे गावातील पूरपरिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांना अन्नधान्य स्वरूपात मदत कार्य करण्यात आले.अचानक महापूर आल्याने घरे मांगर उध्वस्त होऊन प्रचंड वित्तहानी झाल्याची परिस्थिती ओढवून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन पूरग्रस्तांचे नुकसान झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिक पूरग्रस्त जनतेची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचे काम करत असल्याने पूरग्रस्तांनी मनसेचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.

यावेळी पुरग्रस्तांच्या भावना व झालेले एकूण नुकसान शासन स्तरावर मांडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी मनसे सदैव प्रयत्न करेल अशी ग्वाही मनसेच्या पदाधिकऱ्यांनी दिली. पूरग्रस्तांनी आपत्ती प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या भावना महाराष्ट्र सैनिकांसमोर मांडल्या. पूरसदृश्य परिस्थितीची आपत्ती विभाग व हवामान खात्याकडून आगावू पूर्वकल्पना दिली गेल्यास घरातील साहित्य व इतर गोष्टींची हलवाहलव करून नुकसानी टाळता येईल अशा प्रकारच्या भावना पुरग्रस्तांनी व्यक्त केल्या. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,राजेश टंगसाळी, बाबल गावडे,कुणाल किनळेकर,दिपक गावडे,सुंदर गावडे,वैभव धुरी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − three =