You are currently viewing सावंतवाडी आगारातून सुटणाऱ्या बस फेऱ्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू करा – राघोजी सावंत

सावंतवाडी आगारातून सुटणाऱ्या बस फेऱ्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू करा – राघोजी सावंत

शिवसेनेच्या माध्यमातून आगार प्रमुख वैभव पडोळेंना दिले निवेदन

सावंतवाडी

येथील आगारातून सुटणाऱ्या सर्व एसटी बसफेऱ्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू करा,अशी मागणी आज शिवसेनेच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांनी आगार प्रमुख वैभव पडोळे यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी श्री.पडोळे यांना निवेदन दिले.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, गजानन नाटेकर, संजय कनसे, शिवप्रसाद कोळंबेकर, प्रवीण चौघुले, एकनाथ हळदणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, कोकणात श्रावण महिन्यापासुन अनेक सण मोठया उत्साहाने आनंदाने साजरे केले जातात.तालुक्यातील बहुतांश गावातील एस.टी. फे -या रद्द करण्यात आलेल्या आहेत. काही अंशी फे -या सुरु करण्यात आलेल्या आहेत. कोकणातील गणपती उत्सव हा आनंदाचा सण म्हणुन साजरा केला जातो, मुंबई, पुणे अन्य भागातून चाकरमानी मोठया प्रमाणात येत असतात,अशावेळी गणपती उत्सवासाठी लागणा -या घरगुती साहीत्य खरेदीसाठी (बाजाररहाट) शहराकडे यावे लागते. कोविड -१९ साथ सध्या आटोक्यात असल्याने सहाजिकच बाजाररहाट करण्यासाठी शहराकडे येण्यासाठी एस.टी. गाडीची आवश्यकता भासते. आपल्याकडून नियमीत वेळापत्रकाप्रमाणे सुरु असणा -या गाडया त्वरीत सुरु करण्यात याव्यात, तसेच रेल्वे स्टेशनवरुनही गणेशभक्त आपल्या गावी जाण्यासाठी जादा गाड्याच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यात यावी. त्याचप्रमाणे गणेशोत्सवात बाजारहाट करण्यासाठी जादा एस.टी. फे -या सुरु करण्यात याव्यात,असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =